नमस्कार शेतकरी मित्रांनो. ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत जिवाणू खते म्हणजे काय ? ही खते कशाप्रकारे काम करतात आणि त्यांचे विविध फायदे. सेंद्रिय खत च्या माध्यमातून जिवाणू खते परिणामकारक वापरण्याची पद्धत !
सेंद्रिय खत – जिवाणू खते म्हणजे काय ?
जिवाणू खते हे एक प्रकारचे जैविक खत आहे. जैविक खते ही जमिनीची सुपीकता टिकवून ठेवतात, तसेच जैविक खतांच्या नियमित वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो. आपण वर्षानुवर्ष शेतात सेंद्रिय खत वापरतो, पण सेंद्रिय खत विघटनास खूप वेळ लागतो. आपल्याकडे उपलब्ध असलेले सेंद्रिय खत आणि बाजारात अल्प दरात मिळणारे जिवाणू याचा उपयोग करून आपण पिकासाठी संजीवनी असलेले जैविक खत बनवू शकतो.
प्रत्येक शेतकार्याने कधीतरी ह्या खतांचा वापर केलेला आहे. बहुतेक वेळा आपणास कृषी सेवा केंद्रात किंवा औषध कंपन्यांचे प्रतिनिधि सल्ला देतात की ‘किट’ चा वापर करा. हो, हे किट म्हणजेच जिवाणू खते असतात. ह्या किट मध्ये विवध प्रकारचे पिकास उपयुक्त असे बॅक्टेरिया असतात. ह्या मध्ये कुठल्याही प्रकारचे NPK अन्नद्रव्ये नसतात, हे बॅक्टेरिया जमिनीत पडून असलेले (स्थिर) अन्नद्रव्ये, पिकास आवश्यक असलेलल्या स्थितीत उपलब्ध करून देतात. वनस्पति हे विशिष्ट स्वरूपात उपलब्ध असलेले अन्नद्रव्य ग्रहण करू शक्ततात, फिक्स झालेले खाद्य पीक जमिनीतून उचलू शकत नाही. हे बॅक्टेरिया पीक उचलू शकेल ह्या स्थितीत विविध फिक्स झालेले खतांचे रूपांतर करतात.
जिवाणू खते म्हणजे प्रत्यक्ष पिकास उपयुक्त नसून ती अप्रत्यक्ष रित्या काम करतात. आपण सर्वसाधारणपणे विविध रासायनिक खते वापरत असतो, जसे की युरिया, डी. ए. पी., १५:१५:१५ , १०:२६:२६ इत्यादि. ही खते मातीत मिसळल्यावर पूर्णपणे पिकास उपलब्ध होत नाही. असे म्हणतात की यातील फक्त ३० % खाद्य पिकास मिळते व उर्वरित खाद्य रासायनिक अभिक्रिया होऊन मातीत च फिक्स होते व ते पिकास उपलब्ध होत नाही. तर हे फिक्स झालेले खाद्य, पिकास उपलब्ध करून देण्याच काम ही जिवाणू (बॅक्टेरिया – Bactaria) खते करतात. पिकास प्रामुख्याने आवश्यक असलेल्या घटकांचे वेग वेगळे जिवाणू शास्त्रज्ञान्ने शोधून काढले आहेत.
विविध प्रकारचे बॅक्टेरिया व त्यांची कार्यप्रणाली
१ . नत्र उपलब्ध करून देणारे जिवाणू (Nitrogen fixing bacteria)
प्रामुख्याने ही जिवाणू अझेटोबॅक्टर (Azotobacter) व रायझोबिअम (rhizobium) या नावाने ओळखले जातात. ही जिवाणू हवेतील नत्र पिकास आवश्यक असलेलल्या स्वरूपात म्हणजे आमोनिअम स्वरूपात आपलब्ध करून देतात. यामुळे पिकास आवश्यक असलेलला नत्र सहज व कमी खर्चात उपलब्ध होतो व अतिरिक्त युरिया चा वापर कमी होतो , याने खतांचा अतिरिक्त खर्च वाचतो व जमिनीचा पोत सुधारतो व परिणामी पीक हे जोमदार विकसित होते व चांगले उत्पादन मिळते.
२. स्फुरद विरघळवणारे जिवाणू (PSB – Phosphate Solubilizing Bacteria)
पिकाचा वाढीत व विकासात अजून एक महत्वाचा घटक म्हणजे स्फुरद (फॉस्फोरस – phosphorous).फॉस्फोरस हा कॅल्शिअम व आयन (लोह ) सोबत अभिक्रिया करून कॅल्शिअम फोस्फेट व आयन फोस्फेट बनतो, जो पिकास अनुपलब्ध असतो. ही जिवाणू मातीत मिसळल्यावर विविध प्रकारची अॅसिड्स् स्त्रवतात, ही असिडस फोस्फेट चे घट्ट बॉन्ड तोंडतात व स्फुरद पिकास उपलब्ध होतो.
अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी खतावर होणारा खर्च वाचवू शकतो.
३. पालाश विरघळवणारे जिवाणू (PSB – Potash Solublizing Bacteria)
वरील प्रमाणे हे जिवाणू मातीतील आघूळणशील क्षारातून पोट्याशीयम आयन विरघळवतात व पिकास उपलब्ध करून देतात.
अशा प्रकारे विविध प्रकारचे जिवाणू बाजारात अल्प दरात उपलब्ध आहेत, याची किंमत रासायनिक खतांचा तुलनेत खूप कमी आहे आणि फायदे खूप जास्त आहेत, प्रत्येक शेतकऱ्याने ह्या जिवानूंचा वापर आवर्जून केला पाहिजे, पिकाचा सुरुवातीचा अवस्थेत ह्या जियाणूनच/किट चा उपयोग झालाच पाहिजे.
ऊपयुक्त बॅक्टेरिया चे आश्चर्यकारक फायदे
- कमी खर्चात उपयुक्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात, रासायनिक खतांचा खर्च कमी होतो.
- जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारतो, परिणामी उत्पादन चांगले होते.
- माती भूसभुशीत होते, पिकाच्या मुळींना चालना भेटते.
- पिकावरील ताण कमी होण्यास मदत होते.
- पिकाची रोगप्रतिकरक शक्ति वाढते.
वापरण्याची पद्धत –
जिवाणू स्लरी (सेंद्रिय खत – जैविक स्लरी)
जिवाणू स्लरी आपण सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून तयार करू शकतो. जिवाणू स्लरी साठी येणार खर्च हा अत्यल्प असून हा रासायनिक खते व विविध रासायनिक औषधे यांचा तुलनेने खूप कमी आहे.
साहित्य ( 200 लीटर साठी ) –
- 1 ते 2 टोपली ताजे व ओले शेणखत (कुठलेही सेंद्रिय खत चालेल)
- 2.5 लीटर गोमूत्र
- 1 किलो सेद्रिय गूळ
- 1 लीटर NPK कंसोरशीया(वरील दिलेले तीन महत्वाचे जिवाणू एकाच बाटलीत उपलब्ध. नजीकच्या कृषी केंद्रात सहज उपलब्ध आहे. इफको,कोरोमंडल इत्यादि नामांकित कंपन्यांचे अत्यल्प दरात उपलब्ध आहेत )
- 1 किलो ट्रायकोडरमा (जैविक बूरशी नाशक)
- 100 gm मायकोरायझा (सूक्ष्म अन्नद्रवे पिकचा मूळा पर्यंत पोहोचवतात.)
- 1 लीटर पॅसिलोमायसिस (जैविक निमाटोड रोध – उपलब्ध असल्यास )
- 250 ml सल्फर व आयन विरघळवणारे जिवाणू (सोल्युबलायजिंग बॅक्टेरिया) उपलब्ध असल्यास.
- 250 gm जिंक विरघळवणारे जिवाणू (सोल्युबलायजिंग बॅक्टेरिया) उपलब्ध असल्यास.
- 500 ml ई.एम-1 द्रावण ( यामध्ये सूक्ष्म जिवाणू असतात, ज्यामुळे झाडाची रोग प्रतिकारक शक्ति वाढते – मॅपल कंपनीचे amazon या ऑनलाइन वेब साईट वर उपलब्ध – https://amzn.in/d/2Pwyu1l)
वरील सामग्री पैकी 1 ते 5 क्रमांक आवश्यक आहे कारण पिकास NPK (N-नायट्रोजन, P-फॉस्फॉरस, K-पोटाश ) सर्वात जास्त प्रमाणात लागतात.
कृती-
एका टाकी मध्ये 200 लिटर पानी गेऊन त्यात शेण व गोमूत्र टाकून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. मग त्यामध्ये गुळाचे पानी टाकावे मग सर्व सामग्री टाकून घ्यावी. पाण्याची टाकी सावलीत झाकून ठेवावी. मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळेस घड्याळ्याचा दिशेन ढवळावे. शेण, गोमूत्र आणि गुळ यामुळे जीवणूनची संख्या लाखोंने वाढते. याचा जास्तीत जास्त उपयोग पिकास होतो.
पिकास देण्याची पद्धत
- जैविक स्लरी ही संजीव असल्यामुळे ती रासायनिक खतांसोबत देऊ नये
- जैविक स्लरी ड्रेंचिंग द्वारे प्रत्येक झाडस द्यावे.
- पाठपंपाद्वारे ड्रेंचिंग करू शकतो
- पाठपंपाद्वारे फवारणी केल्यास फायदा होतो.
- स्लरी दिल्या नंतर 4 दिवस रासायनिक खते देऊ नये व रासायनिक खते दिल्यानंतर 4 दिवसात स्लरी द्यावी.
पीकाच्या सुरवातिच्या 15 दिवसात किंवा रोप पुनरलगावड केल्यानंतर पहिल्या 8 दिवसात द्यावे.
वरील सामग्री घटक आपण आपल्या शेणखत उखड्यावरून शेतात टाकायच्या काही दिवस आधी थोडे पाण्यात मिक्स करून खताच्या डेपो वर टाकून घ्यावे, याने देखील शेण खताची शक्ति लाखों चा पटीने वाढते.
अनुभव –
या जैविक स्लरी बद्दल आम्ही काही प्रगतिशील शेतकाऱ्यांशी संवाद साधला तर ह्या स्लरी मुळे पिकात त्यांना आमूलाग्र बदल दिसला, पिकाची रोगप्रतिकरक शक्ति वाढली, दिलेले खत झाड चांगल्या प्रकारे उपटेक करत होते. विद्राव्य खते देण्यातील कालावधी कमी झाला व परिणामी खर्च कमी झाला.
(सदर शेतकरी हे प्रगत असून ते विविध प्रकारची पिके घेतात. टोमॅटो, मिरची, कलिंगड, डाळिंब, द्राक्ष, कांदा इत्यादि )
आपण देखील याचा उपयोग करून, कमी खर्चात जोमदार पीक घ्यावे !
Pingback: onion rate today - 24/08/2024 - कृषी अस्मिता
Pingback: हवामान अंदाज - 30 ऑगस्ट ते 6 सेप्टेंबर - कृषी अस्मिता
Pingback: Onion Rate Today - कांदा बाजारभाव- 21 September 2024 - कृषी अस्मिता
Pingback: Onion Rate Today - कांदा बाजारभाव- 30 September 2024 - कृषी अस्मिता
Pingback: Onion Rate Today - कांदा बाजारभाव- 01 October 2024 - कृषी अस्मिता
Pingback: Onion Rate Today - कांदा बाजारभाव- 03 October 2024 - कृषी अस्मिता
Pingback: Onion Rate Today - कांदा बाजारभाव- 04 October 2024 - कृषी अस्मिता