मागील वर्ष दुष्काळाचे काढल्यानंतर, ह्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकार्यान मध्ये समाधानाचे वातावरण आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे नुकसान देखील झाले आहे. पुन्हा एकदा पुढील आठवड्यात पाऊस चांगला बरसणार आहे असा हवामान पुणे हवामान अंदाज वेध शाळेने वर्तवला आहे.
येत्या 48 तासात हवामान अंदाज -
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहिती नुसार येत्या दोन दिवसात उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात 30, 31 ऑगस्ट आणि 1 व 2 सेप्टेंबर रोजी तुरळक भागात पाऊस पडणार आहे, तर 3 तारखेला (सोमवार) बहुतांश भागात हलका ते मध्यम (15 ते 64 सेमी ) स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. 3 तारखेला तुरळक भागात वीजांचा कडकडाटा सह ताशी 30 ते 40 किमी/तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
पंजाब डख हवामान अंदाज महाराष्ट्र
सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब राव डख यांनी देखील 2 सेप्टेंबर ते 6 सेप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच येथील कांदा या पिकाचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
काय घेणार काळजी ?
सततच्या पावसामुळे वेळवर्गीय, तसेच भाजीपाला पिकात बुरूषी जन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो व बऱ्यापैकी प्रमाणात नुकसान होते व हातचे पीक जाते. तरी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी पर्यन्त प्रतिबंधात्मक फवारणी करू घ्यावी.
तसेच 2 व 3 तारखेला अमावस्या आहे, तर अनेक कीटक ही आमवस्याला अंडी घालत असतात तरी त्यासाठी देखील उपाययोजना कराव्यात.
फळ बागायतदारांनी देखील आपले शेडुल अनुसार उपाययोजना पाऊस यायच्या आत करून घ्यावा