ई पीक पाहणी २०२४ शेवटची तारीख – e pik pahani 2024

मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व गारपीटीमूळे अतोनात नुकसान झाले, त्यासाठी शासनाने अनुदान रूपी मदत देखील जाहीर झाली. परंतु ह्या मदती पासून खूप सारे लोक वंचित राहिले, याचे कारण काय तर ७/१२ उताऱ्यावर पीक पाहणीच नोंदवलेली नसणे.
आता संगळ्यानाच हे समजलेले आहे की पीक पाहणी किती महत्वाची आहे.

पूर्वी गावातील तलाठ्याने पीक पाहणी शेतकर्याच्या बांधावर जाऊन करणे अपेक्षित होते परंतु एकाच तलाठ्याच्या अंतर्गत अनेक गांव येत असल्याने यंत्रणेवर विपरीत परिणाम होत होता या साठी शासनाने पीक पाहणे डिजिटल केली आहे याला ई पीक पाहनी (e pik pahani) म्हणतात. यासाठी नव्याने एक अँप विकसित केले आहे, या माध्यमातून शेतकरी घर बसल्या आपली पीक पाहणी नोंदवू शकतात.

पीक पाहणी (e pik pahani ) म्हणजे काय ?

संपूर्ण गांव जमिनीचा लेखा  जोखा हा महसूल कायद्या अनुसार २१ नमुन्यांमध्ये विभागला गेला आहेत. यात नमूना नं. ७ आणि नमूना नं १२ मिळून ७/१२ उतार तयार होत असतो. 

नमूना नं ७ हा जमिनीच्या मालकीच्या तसेच जमिनीचा आकार आणि इतिहास दर्शवतो तर नमूना नं १२ हा ह्या शेतजमीनिवर चालू वर्षी तसेच मागील वर्षांचा पीक वार तपशील दर्शवतो. 

ह्या नमूना नं १२ मध्ये आपल्या शेतातील पीकाचे नोंदणी करणे म्हणजे पीक पाहणी करणे होय. 

ई पीक पाहणी (e pik pahani) करणे का गरजेचे आहे ?

पीक पाहणी हा एक सरकारी पुरावा आणि माहिती स्त्रोत आहे. 

सरकार व प्रशासनास ह्या पीक पाहणी च्या आधारे माहिती एकत्रित करते व त्या आधारे आयात-निर्यात, किमान आधारभूत किंमत, विविध धोरणे इत्यादी शासन ठरवत असते, तर शासनास खरी माहिती देणे हे आपले कर्तव्य आणि आपल्याच हिताचे आहे.

जर राज्यात नैसर्गिक आपत्ती येऊन नुकसान झाले तर ह्याच माहितीच्या आधारे आपली मदत ठरत असते. 

शासनाच्या विविध योजना, पीक विमा, अनुदान इत्यादी चा लाभ घेण्यासाठी पीक पाहणी ही पूर्ण केली पाहिजे. 

पीक पाहणी न लावणे म्हणजे आपली जमीन पडीक आहे असे गृहीत धरले जाते. 

येथून पुढे कुठलीही सबब शासन गृहीत धरेल असे दिसत नाही, तरी सर्वानी पुढाकार घेऊन ई पीक पाहणी (e pik pahani)  कसे करतात , हे शिकण घ्यावे व काळजीने आपापली पीक पाहणी पूर्ण करावी. 

 

ई पीक पाहणी कशी करायची ?

e-pik-pahani

ई पीक पाहणी( e pik pahani) अँप  

घरबसल्या ई पीक पाहणी करण्यासाठी डाउनलोड कराय ‘ई पीक पाहणी DCS’ अँप. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

https://play.google.com/store/search?q=e+pik+pahani&c=apps&hl=en

१. सर्वप्रथम अँप डाउनलोड करा आणि अँप डाउनलोड केल्या नंतर आपला महसूल विभाग  निवडा. उदा. नाशिक व हिरव्या बटणावर क्लिक करा. 

२. शेतकरी म्हणून लोंगइन निवडा आणि आपला मोबाइल नंबर प्रविष्ट करून लोंग इन करा. 

३. आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. 

४. आपले नाव शोधा आणि खाते क्रमांक नोंद करून ठेवा. 

५. नोंद करून ठेवलेला क्रमांक संकेतांक मध्ये टाका. 

या नंतर माहिती भरण्यासाठी एक फोर्म उघडेल त्यात सर्व माहिती समाविष्ट करा. 

जसे की, 

 खातेदाराचे नाव, खाते क्रमांक, गट क्रमांक, इत्यादि निवडा आणि माहितीची पडताळणी करणे. 

हंगाम – उदा. खरीप

पीक वर्ग – निर्भेळ पीक आणि मिश्र पैकी एक. (निर्भेळ म्हणजे एकच पीक आणि एकत्रित म्हणजे एकाच क्षेत्रात २ पिके) 

निर्भेळ पिकाचा प्रकार – पीक किंवा फळबाग यापैकी एक 

पिकाचे/झाडांची  नावे  – जसे की मका (धान्यासाठी). 

पेरणी क्षेत्र – आपले एकूण क्षेत्रापैकी पिकाखालील क्षेत्र निवडावे. हे क्षेत्र हेक्टर मध्ये निवडायचे आहे.
जसे की 
१ हेक्टर = १०० आर = १०० गुंठे

उदा. जर आपले २ एकर क्षेत्र पिकाखाली आहे. 

१ एकर = ४० गुंठे 
२ एकर = 8० गुंठे 

म्हणजे 80 गुंठे म्हणजे 80 आर. 

तर एकूण पिकाखालील क्षेत्र हे 0.80 हेक्टर एवढे होईल. 

सर्व माहिती भरून आपणास आपल्या पिकाचा फोटो काढायचा आहे नंतर ते ऑटोमॅटिक आपले लोकेशन चे रेखांश आणि अक्षांश घेते. 

जलसिंचनाचे साधने निवडा – उदा. विहीर

सिंचन पद्धती – जसे की प्रवाही सिंचन म्हणजे फ्लड पानी. 

लागवडीचा दिनांक- पेरणीची तारीख निवडावी 

यानंतर आपणास एक प्रश्न विचारण्यात येईल. 
” किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नोंदणी करावयाची आहे का ?”

म्हणजे किमान आधारभूत किमतीत आपल्याला सरकार ला योजनेअंतर्गत धान्य विकायचे असेल तर आपल्याला नोंदणी करावी लागते, तर आपण ही नोंदणी इथेच करू शकतो. करण्यासाठी ‘होय’ पुढे निवड करा. 

त्यानंतर पुढे जा आणि 
आपल्या पिकाचे  2 फोटो काढायचा आहे.  ‘छायाचित्र 1 ” आणि “छायाचित्र 2″ वर क्लिक करून फोटो काढावे. व बरोबर च्या चिन्हावर क्लिक करा 

नंतर ते ऑटोमॅटिक आपले लोकेशन चे रेखांश आणि अक्षांश घेते. 
अशा प्रकारे आपली पीक पाहणी आपण पूर्ण करू शकतो. 

ई पीक पाहणी वेबसाइट  

ई पीक पाहणी आपण शासनाच्या वेबसाइट वरुण देखील करू शकतो. 
https://epeek.mahabhumi.gov.in/misv2/

ई पीक पाहणी शेवटची तारीख

ई पीक पाहणी साठी शेवटची तारीख १५ सेप्टेंबर २०२४ (15/09/2024)  आहे. ह्या तारखेपर्यंत पीक पाहणी लावणे अनिवार्य आहे. 

काही तांत्रीक अडचण असल्यास आपण महाराष्ट्र शासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकतो. 

ई पीक पाहणी हेल्पलाइन नंबर – 020 2571 2712

This Post Has 2 Comments

Leave a Reply