कांदा रोप (kanda Rop) व्यवस्थापन – Onion Plant

कांदा रोप

कांदा रोप व्यवस्थापन जितके उत्कृष्ट तितके कांद्याचे पीक भारी ! ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या श्लोका प्रमाणे जेवढे रोप सदृढ तेवढे पीक सदृढ असते. कमी वयात रोपाचे योग्य पोषण झाल्यास पीक लवकर रोग राईस बळी पडत नाही. म्हणून कांदा रोपाचे योग्य व्यवस्थापन होणे तितकेच गरजेचे आहे. ह्या लेखात आपण शाश्वत आणि एकात्मिक रित्या कांदा रोप व्यवस्थापन कसे करावे हे बघणार आहोत.

कांदा रोप - मुळ समस्या, का होते रोप खराब ?

कांदा रोप तयार करताना सर्वसाधारण पने प्रमुख समस्या म्हणजे रोपाची मर होणे, रोप कुजणे, करपा येणे, शेंडे पिवळे पडणे, रोप शेडयापासून सुकत जाणे व मरण पावणे, इत्यादी. 

ह्या सर्व समस्यांचे मुळ आहे ‘जमीनीत तयार होणाऱ्या बुरुशा’.  पाण्याचे अयोग्य नियोजन, बेमोसमी पाऊस, वातावरणात असलेली आर्दता, जमीनितील पाण्याचा निचरा न होणे इत्यादी कारणांमुळे ह्या बुरुशा तयार होतात. 

ह्या व अशा अनेक समस्या कमी खर्चात नियंत्रित करण्यासाठी कांदा रोपांचे एकात्मिक रोप व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 

कांदा रोप - एकात्मिक व्यवस्थापन

एकात्मिक व्यवस्थापन म्हणजे पीक कुठल्याही रोगास बळी पडण्याचा अगोदर सर्व दृष्टिकोनातून पहिलेच केलेले व्यवस्थापन म्हणजे ‘एकात्मिक व्यवस्थापन’. 

एकात्मिक व्यवस्थापन करताना खालील दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे. 
1. रोप टाकण्याची जमीन
2. पानी व्यवस्थापन 
3. अन्नद्रव्य व्यवस्थापन 
4. जैविक व रासायनिक रोगराई नियंत्रण आणि व्यवस्थापन. 

इत्यादी गोष्टींचा विचार करून पाऊले उचलली म्हणजे एकात्मिक नियोजन. 

कांदा रोप - कशी असावी जमीन/ रोपासाठी कशी जमीन तयार करायची ?

कांदा रोपासाठी जमीन ही फार महत्वाची आहे. कारण खूप कमी जागेत लाखो च्या संख्येने रोप तयार होत असतात. त्यामुळे जमीन पानी जास्त धरून ठेवते, जमीनी पर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही, त्यामुळे साहजिकच बुरशा वाढीस लागतात. म्हणून पाण्याचा निचरा होणारी, हलक्या मातीची  जमीन रोपासाठी निवडणे महत्वाचे ठरते. 

जर भारी जमीन असेल तर पानी व्यवस्थापन हे रेनपाइप/ स्प्रीकलर ने करत असाल तर रोटर मारल्यानंतर 8 फुट अंतरावर बैलजोडी/ट्रॅक्टर चा सहायाने खोल सरी टाकायाची, जेनेकरुण रोप साठी उंच-सपाट जागा तयार होईल व पाण्याचा निचरा होऊन पीक निरोगी राहील.

मध्ये सरी टाकल्यामुळे रोपवर फवारणी करणे सोपे होईल, रोप पायदळी तुडवले नाही जाणार. 

बेमोसमी पाऊस झाल्यास, वापसा येई पर्यंत अनेक बुरूषीजन्य आजार वाढीस लागतात. सरी मध्ये जागा असल्यामुळे लवकरात लवकर फवारणी केली जाते व संभाव्य रोगामुळे होणारे नुकसान वेळीच थांबवले जाते. 

कांदा रोप - रेनपाइप/स्प्रींकलर (तुषार सिंचन) का वापरावे ?

कांदा रोप पारंपारीक पद्धतीने वाफ्यामध्ये टाकून जर मोकळे (फ्लड पानी) पद्धत वापरल्यास बेमोसमी पावसात पाण्याचे नियोजन करता येत नाही. पावसाचे पानी  अँसीडीक असते त्यामुळे पाऊस झाल्यानंतर विहीर/कुपनलिकेचे ‘काळे पानी’ दिल्यास फायदा होतो असे अनेक अनुभवी शेतकऱ्यांनी सांगितले. 

खारवा मोडण्यासाठी, जमिनीत ओलावा असताना थोड्या प्रमाणात पानी द्यायचे असेल तर रेनपाइप/स्प्रींकलर (तुषार सिंचन) उपयुक्त ठरते. 

खरीप कांदा रोप कालावधी (सेप्टेंबर ते डिसेंबर) ह्या महिन्यात रात्री धुके पडण्याचे प्रमाण खूप असते, त्यामुळे सकाळी रोपावर दव संचते व रोप रोगराईस बळी पडते. अशा परिस्थित सकाळी 10 मिनिट रेनपाइप/स्प्रींकलर (तुषार सिंचन)याने पानी दिल्यास दव ही धुतली जाते व संभाव्य करपा टाळता येतो. 

कांदा बियाणे निवड व पूर्वप्रक्रिया

कांदा बियाणे घेताना कुठल्याही नामांकित कंपनी चे बियाणे घ्यावे, कांद्याची क्वालिटी ही बियाणे याच बरोबर व्यवस्थापन आणि स्थानिक हवामान – वातावरण या वर अवलंबून असते. पंचगंगा, प्रशांत, प्रसाद, राही, बेला, मुलकण इत्यादी कंपनी चे घेऊ शकतात, याचा अनुभव बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला आला आहे. 

घरगुती बियाणे प्रक्रिया करून च टाकावे, जेणेकरून त्याची उगवण चांगल्या प्रकारे होईल. बियाणे प्रक्रिया 2 प्रकारे करता येते – 
1. रासायनिक – थायरम किंवा कार्बेंडॅझीम – 3 ग्रॅम/ एक किलो बियाणे या प्रमाणे चोळून घ्यावे. 
2. जैविक – ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम/एक किलो बियाणे या प्रमाणे बियाणे टाकण्या पूर्वी चोळून घ्यावे. 

पॅकिंगचे/विकतचे बियाणे प्रक्रिया करावे का ?

पॅकिंग चे बियाणे प्रक्रिया केलेले असते. याबाबत ‘कृषी विज्ञान केंद्र’, मालेगाव च्या अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केलेली असली तरी वरील प्रमाणे प्रकिया करून घ्यावी असा सल्ला दिला आहे. 

कांदा रोप खत व्यवस्थापन - बेसल डोस

कांदा रोप टाकण्यापूर्वी जैविक व रासायनिक पद्धतीने बेसल डोस टाकु शकतो. सर्व प्रथम जर आपल्याकडे चांगले कुजलेले शेणखत असेल तर ते टाकून घ्यावे. 

रोप संख्या जमिनीत जास्त असल्यामुळे माती मध्ये जिवाणू हालचाल जेवढी चांगली तेवढे रोप चांगले असणार आहे, त्यामुळे जैविक खत जाणे गरजेचे आहे. 

जैविक बेसल डोस – 
1. सर्वप्रथम 2 बॅग कंपोस्ट खत

चांगले कुजलेले शेणखत 4 टोपल्या, त्यात 2 टोपल्या आपल्या शेतातील माती टाकून घ्यावी. त्याचा डेपो लाऊन त्यात 3 -4 लिटर पानी शिंपडून घ्यावे.

(वरील घटक पूरक म्हणून उपयोग होईल. 

2. त्यात 1 लिटर एन-पी-के कंसोरशिया (NPK Consortia) –  यात जमिनीत असलेले नत्र/स्फुरद/पालाष (नायट्रोजन,फोस्फरस, पोटँश) उपलब्ध करून देणारे जिवाणू असतात. (या ऐवजी sygenta चे हायरो+ वापरू शकतो). बाजारात मिळणाऱ्या विविध किट मध्ये हेच जिवाणू असतात. 

3. ट्रायकोडर्मा 1 किलो 

4. यामध्ये आपण एखादा बायो प्रॉडक्ट देखील टाकावा जेणेकरून रोपास विविध प्रकारचे प्रथिने, महत्वपूर्ण फुलविक अँसिड, अमिनो अँसिड उपलब्ध होतील.

उदा.देवांश अगरो चे एक्सप्रो-डी आणि सॉइल विटा ही जोड गोळी टाकावी किंवा प्लॅनटो किंवा अन्नपूर्णा किंवा बायोपॉवर जेणेकरून पिकाचे सर्वसमावेशक पोषण होईल. 

जैविक डोस मध्ये चुकूनही रासायनिक खताचा वापर करू नये कारण रसायना मुळे जैविक जीवणू मरण पावतात. दोन्ही एकत्रित देऊ नये, द्यायचेच असेल तर माती आड देऊ शकतो, पहिले रासायनिक डोस कंपोस्ट  खतात मिसळून टाकावे व नंतर जैविक टाकावे. 

रासायनिक डोस
रासायनिक टाकायचा असेल तर त्यात 15 15 15 एकरी 2 बॅग आणि कोपर ऑक्सीक्लोराइड 2 किलो प्रती एकर वापरू शकतो. 

केमिकल चा वापर न करता वरील प्रमाणे जैविक बेसल डोस दिला तर त्याचा खर्च रासायनिक पेक्षा कमी आहे आणि सर्वांगीण फायदे आहेत, म्हणून जैविक चाच  वापर करावा. जमीन भुसभुशीत होईल व रोपची रोग प्रतिकरक शक्ति वाढेल व भविष्यात पीक ही भरघोस येईल 

विविध समस्या आणि त्याचे एकात्मिक नियोजन

कांदा रोप एकसमान उगवणी साठी काय करावे ?

रोपाची उगवण हे बियाण्याची गुणवत्ता, जमिनीची सुपीकता, बाह्य वातावरण इत्यादि घटकांवर अवलंबून असते. एकसमान उगवण होण्यासाठी सर्वप्रथम नामांकित कंपनी चे बियाणे घ्यावे, घरगुती असेल तर बियाणे पेरणी पर्यंत कोरड्या व मर्यादित खेळती हवा आणि थंड वातावरणात साठवणूक करून ठेवावावी. 

पेरणी पूर्वी बियाणे प्रक्रिया करावी (वर दिल्या प्रमाणे).

बियाणे पेरल्यानंतर लवकरात लवकर पानी द्यावे. 

पेरणी केल्यानंतर पहिल्या 2 दिवसात डॉ. बावस्कर यांचे ‘जर्मीनेटर’ (Dr. Bavaskar’s Germinator) हे औषध रेनपाईप/स्प्रींकलर च्या माध्यमातून सोडणे (औषध खूप महाग नाहीए). इत्यादी काळजी घ्यावी.

उगवणीनंतर कांदा रोप मर रोग उपाययोजना

रोप उगवणीनंतर रोप हे खूप कोवळे असते, त्यास बाह्य वातावरणात जुळवून घेणे कठीण जाते. रोपावर ताण (स्ट्रैस) येतो व रोप मरण पावते. त्याच बरोबर मर होण्यास बुरूषी देखील कारणीभूत असते. 

या साठी पेरणी झाल्यानंतर 8 ते 10 दिवसात फवारणी होणे गरजेचे आहे. यात एखाद बुरूषी नाशक आणि ताकद देण्यासाठी सी वीड बेस बायो एनहॅन्सर चा वापर करावा. 

उदा. सिजेन्टा वालअग्रो चे मेगाफॉल आणि रिडॉमिल गोल्ड ची फवारणी घेऊ शकतात. 

कांदा रोप तननाशक

कांदा रोपा साठी डाउ कंपनीचे गोल (Oxyfluorfen 23.5% Ec) आणि धानुका कंपनीचे टरगा सुपर (Quizalofop Ethyl 5% EC) हे तन नाशक अनेक वर्षापासून  उपयुक्त ठरत आहेत. कांदा रोपात 18 ते 20 व्या दिवशी एका लिटर ला अर्धा हे प्रमाण घेतल्यास चांगला रिजल्ट भेटतो. (खरेदी करताना विक्रेत्याकडून एकदा प्रमाण खात्री करणे ). 

द्रावण तयार करताना त्यामध्ये सुरवातीला चांगल्या कंपनी चे पीएच बँलन्सर टाकून घेणे, याने द्रावण एक जीव होते व छान रिजल्ट मिळतो. 

तन नाशकात युरिया टाकावा का ?

द्रावणात 200 लिटर साथी 2 किलो युरिया टाकणे असा सल्ला विविध अनुभवी शेतकरी व कृषी केंद्र चालकांनी दिला, युरिया मध्ये नत्र असल्यामुळे तन नाशक हे रोपाच्या मुळापर्यंत पोहोचते व तनाचा मूळापासून नायनाट होतो. 

धुक्यामध्ये/ दव पासून कशी काळजी घ्यायची ?

धुक्यामुळे सकाळी कांद्याचा रोपावर दव बिंदु साचतात,ह्यामुळे रोप पिवळे पडते, रोप कमकुवत होते आणि बुरूषी जन्य रोग रोपावर अटॅक करतात. त्यासाठी नॉन- आयोनिक स्टीकर घेऊन त्याची फवारणी करावी. जेणे करून दव बिंदु रोपांच्या पाती वर टिकून राहणार नाहीत. 

विविध फवारणी मध्ये स्टीकर चा वापर करावा. 

रेनपाइप/स्प्रीकलर वापरले असल्यास सकाळी 10 मिनिट पानी सोडणे जेणेकरून दव बिंदु धुतले जातील. 

तननाशक मारल्यानंतर रोपा मध्ये मरगळ आली आहे ?

तननाशक मारल्यानंतर रोप हे असह्य तनावात जाते अशावेळी रोपाला ताकद देण्याची आवश्यकता असते. तन नाशक मारल्यानंतर 4 ते 5 दिवसात तन हे पिवळे पडते. आत्ता आपल्या रोपाचे वे हे 24 ते 25 दिवस झाले आहे, अशावेळी एन-पी-के सह इतर अन्न द्रव्ये तसेच बायो स्टीमूलंन्ट देणे फायद्याचे ठरते. 

यामध्ये ओमेक्स चे बायो 20 (NPK 20-20-20, दुय्यम तसेच सूक्ष्म अन्न द्रव्ये आणि सी वीड आहे) त्यात झिनर्जी (जिंक, सल्फर, कोपर) हे जैविक बुरूषीनाशक याची फवारणी घ्यावी किंवा
 देवांश अग्रो चे प्रोटेक्स-डी, बायोसेफ चा हात घ्यावा.

कांदा रोपात कीड नियंत्रण

कांदा रोपा मध्ये मुख्यतो थ्रीप्स चा प्रादुर्भाव होतो, रोप मोठे झाल्यानंतर दाट होते व असे वातावरण थ्रीप्स ला पोशक असते.यासाठी एकात्मिक नियोजन करणे गरजेचे आहे. आपल्या कडे अत्यंत अल्प दरात पिवळे-निळे चिकट सापळे मिळतात.

रोप 15 दिवसाचे झाल्यानंतर प्लॉट चा एक कोपऱ्याला एक नीळा व एक पिवळा सापळा लावावा व निरीक्षण करावे. जर सापळ्यास थ्रीप्स चिकटलेले दिसले तर पूर्ण क्षेत्रात सापळे लावावेत व आपल्या फवारणी वेळा पत्रकात कीटकनाशका चा समावेश करावा.

‘उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे’ ह्या उक्ती प्रमाणे रोगराई आल्यावर फवारण्या केला तर खर्च जास्त होतो, त्यापेक्षा प्रतिबंध्यात्मक नियोजन केव्हाही चांगले.

This Post Has 4 Comments

Leave a Reply