Onion Rate Today – कांदा बाजारभाव- 25 September 2024

Onion Rate Today 
नमस्कार मित्रांनो, बघूया आज काय होती कांदा बाजार भावाची आणि आवकेची परिस्थिति 

मोसम परिसरातील महत्वाचे कांदा मार्केट - Onion rate today Mosam Premise

आज दिनांक 25 सेप्टेंबर रोजी, माथाडी कामगारांचे भाग्यविधाते स्व.आण्णासाहेब पाटील यांची 91 वी जयंती. त्यानिमित्ताने आज राज्यातील माथाडी कर्मचाऱ्यांचा मुंबई येथे मेळावा भरवण्यात आला होता. राज्यातील बहुतांश बाजार हे बंद होते. काही खाजगी बाजार समिती चालू होत्या. बघूया आज काय होते मार्केट. 

1. नामपूर खाजगी  बाजार समिती –

4700 ते 5000 = 49
4500 ते 4700 = 86
4000 ते 4500 = 61
2000 ते 3000 = 32

एकूण वाहन – 265
क्विंटल – 5500

2. ढोलबारे खाजगी बाजार समिती –

4700 ते 5010 = 79
4400 ते 4700 = 61
3500 ते 4400 = 28
3000 ते 3500 = 25
700 ते 3000 = 17

एकूण वाहन – 210
क्विंटल – 4200

आज जास्तीत जास्त भाव हा 5000 रुपये पर्यंत निघाला तर सरासरी भावात 100 रुपये घसरण झालेली आहे. 

महाराष्ट्र राज्य सर्व मार्केट कांदा बाजारभाव - onion rate today in maharashtra ​

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
25/09/2024
कोल्हापूर क्विंटल 4398 1500 5000 3200
अकोला क्विंटल 270 3000 4500 3500
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 695 1600 4400 3000
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 246 2500 5000 4000
खेड-चाकण क्विंटल 1000 3000 4500 4000
मंचर- वणी क्विंटल 2020 3800 5000 4425
सातारा क्विंटल 87 4000 5000 4500
कराड हालवा क्विंटल 198 3000 5000 5000
अकलुज लाल क्विंटल 215 1600 5300 3800
सोलापूर लाल क्विंटल 15207 1000 5500 4000
बारामती लाल क्विंटल 701 700 4800 3800
अमरावती- फळ आणि भाजीपाला लाल क्विंटल 240 3000 6000 4500
जळगाव लाल क्विंटल 458 1250 4377 2750
शिरपूर लाल क्विंटल 172 1350 5050 4075
साक्री लाल क्विंटल 4010 4325 4700 4550
हिंगणा लाल क्विंटल 1 5000 5000 5000
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 2930 1500 4800 3150
पुणे लोकल क्विंटल 8888 3000 4800 3900
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 14 4000 5000 4500
वाई लोकल क्विंटल 25 3000 5000 4500
मंगळवेढा लोकल क्विंटल 161 500 4600 3300
कल्याण नं. १ क्विंटल 3 4000 5500 4750
सोलापूर पांढरा क्विंटल 2018 1000 4500 3000
नाशिक उन्हाळी क्विंटल 1476 3300 4800 4550
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 6096 1000 4851 4450
नेवासा -घोडेगाव उन्हाळी क्विंटल 19034 1000 4800 3500
पारनेर उन्हाळी क्विंटल 7730 1500 5000 4200
भुसावळ उन्हाळी क्विंटल 1 4000 4000 4000
रामटेक उन्हाळी क्विंटल 10 3500 4000 3900
valagro megafol

अफगाणिस्तानातून कांदा आयात - Afganistan onion import

भारत सरकारकडून कांदा दर नियंत्रणासाठी अफगाणी स्तानातून कांदा आयात केला आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात कमालीचा रोष व्यक्त होत आहे. आज 2 गाडी कांदा हा पंजाब राज्यात विकण्यासाठी उतरवला आहे. आपल्या देशात भरपूर कांदा लागवड झालेली असताना आता ही आयात का ? आणि एकीकडे निर्यात खुली करायची आणि दुसरीकडे आयात करायची हा सरकार चा दुटप्पी पणा नाही का ? असे संतप्त सवाल शेतकाऱ्यांन मार्फत विचारले जात आहेत. 

सदर आयात ही क्षुल्लक असली तरी ह्या मुळे भीतीचे वातावरण तयार होते, आवक वाढते व भाव पडतात. साधा भोळा  बळीराजा घाबरून आपला माल विकातो व नंतर व्यापारी मालामाल होतात, हे कायमचेच झाले आहेत. याची सर्व कसर येत्या निवडणुकांत निघण्याची दांट शक्यता आहे. 

उद्या आवक चढीच राहील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे, शेतकरींनी घाबरून न जाता आपला माल टप्या टप्याने विकावा असे आवाहन तज्ञ करीत आहे. ह्या आयातीचा खूप परिणाम होणार नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे.  

Leave a Reply