नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सगळे पीक विमा दर वर्षी भरत आलो आहोत, परंतु नुकसान झाले की आपल्याला काहीही मिळत नाही व पैसे वाया जातात असा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला असेलच. ह्या वर्षी सरकारने ‘१ रुपयात विमा’ उपलब्ध करून दिला आहे आणि बऱ्यापैकी आपण हा विमा घेतला देखील आहे.
आता आपले नैसर्गिक आपत्ति (अतिवृष्टी, गरपीट इ.) यामुळे नुकसान झाले आहे .मग कसा मिळवायचा विमा ? कसं करायचं पीक विमा क्लेम ? सविस्तर माहितीकरता पूर्ण माहिती वाचा.
नुकसान पीक विमा पूर्वसूचना केव्हा द्यावी ?
प्रधान मंत्री पीक विमा योजना ही आपल्या राज्यात २०१६ पासून कार्यरत आहे. आत्ता पर्यन्त विमा क्लेम फक्त सरकारी यंत्रणेवर अवलंबून होता.
मात्र चालू वर्षी नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी पूर्वसूचना देणे बंधनकारक केले आहे. नुकसान झाल्या नंतर ३ दिवसात म्हणजे ७२ तासाच्या आत पूर्वसूचना दिल्यास नुकसान ग्राह्य धरले जाईल. आपल्या परिसरात अतिवृष्टी झाली आहे की नाही ही पडताळणी विमा कंपनी राज्य सरकार महसूल विभागाकडून घेईल. पूर्वसूचना खरी आहे अशी खात्री पटल्यानंतर विमा कंपनी प्रतिनिधि आपल्या शेतात प्रत्यक्ष पाहणी करतील.
अशी द्या पूर्व सूचना -
१. आपण टोल फ्री क्रमांकावर कॉल करून पूर्व सूचना देऊ शकतो
कृषी रक्षक पोर्टल हेल्प लाइन नंबर – 14447
२. प्रधान मंत्री पीक विमा योजना चे अँप्लीकेशन डाउनलोड करू शकतो, त्या वर गरजेची ती माहिती आणि प्रत्यक्ष दर्शी फोटो आपलोड करू शकतो.पूर्वसूचना देणे खूप सोपे आहे.
डाउनलोड करा – https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central&pli=1
पूर्व सूचना दिल्या नंतर एक ‘डोकेट‘ क्रमांक स्क्रीन वर दिसेल तो क्रमांक जपून ठेवावा किंवा लिहून ठेवावा.
३. स्थानिक कृषी अधिकार्यास पूर्व सूचना देऊ शकतात
केव्हा करावी पीक विमा पूर्व सूचना ?
१. जर हवामानात बदल होऊन पिकाच्या उत्पन्नावर परिणाम झाला असेल तर
२.गारपिट, वादळी वारा, अतिवृष्टी मुळे झालेले नुकसान
३. पीक काढणी नंतर झालेल नुकसान
कीड रोगामुळे नुकसान झाले असल्यास तक्रार करू नये .
पूर्व सूचना दिल्यानंतर आपण काय करावे ?
विमा कंपनी व तालुका कृषि अधिकार्याकडे ‘डोकेट‘ क्रमांक सह पाठपुरवठा करावा व आपला हक्काची भरपाई पदरात पडून घ्यावी.