रोपवाटिका योजना ही महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय कृषी विकास योजणेअंतर्गत २०२० पासून “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना” या नावाने राबविण्यात येते. ह्या योजनेला २०२४-२५ ह्या आर्थिक वर्षात देखील राबविण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन आणि आशादायक योजना सुरू करण्यात आलेली आहे, जी त्यांच्या भाजीपाला उत्पादनाच्या क्षमतेला एक नवा आयाम देईल. या योजनेंचा नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, जी राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत कार्यान्वित होत आहे. या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण या योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांची आणि फायदेशीरतेची सविस्तर माहिती घेऊया.
रोपवाटिका योजना - योजनेचे उद्देश:
1. स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायास प्रोत्साहन देणे.
2. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ करणे.
3. निरोगी व रोगमुक्त रोपे तयार करणे. विषमुक्त शेती कडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणे.
4. निर्यात क्षम उत्पादनास प्रोत्साहन देणे.
5. ग्रामीण युवक व महिलांना स्वयंरोजगाराची संधी
काय मिळणार रोपवाटिका योजना अंतर्गत ?
समाविष्ट घटक –
1. शेडनेट – 1000 चौ. मी. (10 गुंठे )
2. पॉलीटनेल – 1000 चौ. मी. (10 गुंठे ) – ऐच्छिक
3. प्लॅस्टिक कँरेट – 62
4. पाठ पंप – 1
अर्थसाहाय्य –
एकूण प्रकल्पाचा खर्च शासनाने ५,५५,000 रुपये गृहीत धरला आहे.
या हिशोबाने ५०% अनुदान म्हणजे एकूण २,७७,५०० रुपये अनुदान देय राहील.
जर प्रकल्प खर्च वाढता असेल तरी मर्यादित २,७७,५०० रुपये अनुदान देय राहील.
योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष -
निकष –
१. अर्जदाराकडे मालकीची १ एकर जमीन असणे आवश्यक.
२. पानीपुरवठ्याची सोय असणे आवश्यक.
लाभार्थी निवड प्राधान्यक्रम –
१. महिला कृषी पदवी/पदविका धारक
२. शेतकरी महिला गट
३. भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी
४. सर्वसाधारण शेतकरी
योजने मध्ये निवड झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांचा संमती ने कामास सुरुवात करावी.
प्रकल्प पूर्ण झाल्यावर कृषी सहायक पाहणी करतील व त्यांचा संमतीने ६० % अनुदान खात्यात जमा होईल.
उर्वरीत ४० % रक्कम ही प्रत्यक्ष रोपे तयार झाल्यावर कृषी सहायक यांचा संमतीने जमा करण्यात येईल
योजनेसाठी असा कर अर्ज -
1. ह्या योजनेसाठी अर्ज करण्याकरता “आपले सरकार – महा DBT” – ह्या संकेत स्थळावर अर्ज करा.
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login (नजीकच्या ग्राहक सेवा केंद्राला – CSC सेंटर ला भेट द्या.
२. तालुका कृषी अधिकारी यांचा कडे अर्ज करावा/ अधिक माहिती साठी संपर्क करू शकतो.
3. योजनेच्या अधिक माहिती करता कॉल करा टोल फ्री क्रमांकावर – 1800 2334 000
Pingback: Onion Rate Today - महाराष्ट्र बाजारभाव- 09 September 2024 - कृषी अस्मिता
Pingback: Onion Rate Today - महाराष्ट्र बाजारभाव- 10 September 2024 - कृषी अस्मिता